Advertisement

मुंबईत कोरोनाचे १०४६ नवे रुग्ण, दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू

रविवारी दिवसभरात ११९३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७१ हजार ६८५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे १०४६ नवे रुग्ण, दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी कोरोनाच्या रुग्णांनी १ लाखांचा टप्पा ओलांडल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झालेली आहे. तर मुंबईत रविवारी दिवसभरात १०४६ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- पोलिस भरती! १२ हजार पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार -गृहमंत्री अनिल देशमुख

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६४ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जुलै रोजी ४७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १२ जुलै रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे १०४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १२२४ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ११९३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७१ हजार ६८५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- नॉन कोविड रुग्णांना रुग्णालयात जायची वाटतेय भीती

राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७, ठाणे मनपा-१२,नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-२२, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी-निजामपूर मनपा-७, पालघर-१,वसई-विरार मनपा-११, रायगड-८, नाशिक-५, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-१०, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-५, पुणे मनपा-२५, पिंपरी-चिंचवड मनपा-१५,सोलापूर-१, सोलापूर मनपा-१, सातारा-५, कोल्हापूर-१, सांगली-४, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-५, जालना-१, परभणी मनपा-१, लातूर-२,लातूर मनपा-२, उस्मानाबाद-१, अकोला-२, यवतमाळ-१, वाशिम-१, नागपूर-१, नागपूर मनपा-६ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा