Advertisement

नॉन कोविड रुग्णांना रुग्णालयात जायची वाटतेय भीती

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलमधील डॉक्टारांनी दिलेल्या माहीतीनुसार भितीपोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करत असून, स्वतःच्या मनानेच औषधोपचार करण्याचा धोका पत्करत आहेत.

नॉन कोविड रुग्णांना रुग्णालयात जायची वाटतेय भीती
SHARES

दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या तसंच, शहरातील परिस्थिती पाहता मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भीतीपोटी नॉन कोविड रुग्ण रुग्णालयात जाण्यास घाबरत आहेत. मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलमधील डॉक्टारांनी दिलेल्या माहीतीनुसार भितीपोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करत असून, स्वतःच्या मनानेच औषधोपचार करण्याचा धोका पत्करत आहेत. एकीकडे पावसाळी आजार तर दुसरीकडं कोरोना यांची लक्षणं काही प्रमाणात सारखी असून डॉक्टरांनाही उपचारांमध्ये अनेक आव्हानं पेलावी लागत असल्याचं दिसून येत आहे.

रुग्णालयं, क्विनीक तसंच तेथील कमर्चारी वर्ग सुरक्षिततेच्या बाबीतल विशेष खबरदारी घेत असून, कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्याकरिता आवश्यक त्या सर्वच बाबींचं पालन करत आहेत. 'पावसाळी आजारांचं प्रमाण वाढत आहे. यामध्ये ताप, सर्दी, श्वसन विकारांनीही डोकं वर काढलं आहे. या आजारांची लक्षणं तसंच, कोरोनाची लक्षणं जवळपास सारखी असल्यानं रोगाचं निदान करणं डॉक्टरांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. विविध लक्षणे दिसत असूनही नागरिक कोरोनाच्या भितीपोटी नातेवाईक, परिसरातील शेजारी तसंच, डॉक्टरांना याविषयी माहिती न देता घरबसल्या स्वतःच्या मनानं औषधोपचार करत असून, असं करणं त्यांच्या आरोग्यास घातक असून त्याची मोठी किंमत या नागरिकांना मोजावी लागू शकते', अशी माहिती मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलचे इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ तुषार राणे यांनी दिली.

गुंतागुंत वाढल्यास, तब्येत खालावल्यास शेवटच्या क्षणी नागरिक रुग्णांलयाला भेट देत असल्यानं डॉक्टरांना अशा वेळी रुग्णाला धोक्याबाहेर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. अशा वेळी कमीत कमी वेळात योग्य निदान करणं डॉक्टरांकरिता अवघड झालं असून, उपाचारास विलंब झाल्यानं रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

'मागील ३ महिन्यात सोशल मिडीया तसंच, इतर माध्यमांमधून नागरिकांना कोरोनाची लक्षणांबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे. मात्र, हीच लक्षणं डेंग्यु, मलेरिया, चिकनगुन्या आदी आजारांमध्येही पहायला मिळत असल्यानं त्यांचा गोंधळ उडत आहे. निदान करणं देखील अवघड ठरत आहे. अशा वेळी मनानं औषधोपचार न करता वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या', असं डॉ तुषार राणे यांनी स्पष्ट केलं.

'डेंग्यू आणि मलेरियासारखे पावसाळी आजार वाढत आहेत. झेन हॉस्पिटलनं गेल्या काही दिवसांत डेंग्यू आणि मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार केले आहेत. मलेरिया सारखा आजार प्राणघातक असू शकतो आणि सद्यपरिस्थितीत कोरोनाच्या आणि पावसाळी आजार यांचं अचूक निदान करणं डॉक्टरांना आव्हानात्मक ठरणार आहे. बरेचशे नागरिक जे कोरोनाव्हायरस बाधित असू शकतात हे माहित असूनही डॉक्टरांकड जाण्याची भीती बाळगतात', असं झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूरचे सल्लागार डॉक्टर, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत शाह यांनी म्हटलं.

'अशी' दक्षता घ्यावी

  • ताप केवळ कोरोना मध्येच नव्हे तर बहुतेक पावसाळी आजारांमध्ये दिसून येतो. 
  • लक्षणांकडं दुर्लक्ष करुन उपचारांना उशीर केल्यानं हे आजारपण जीवावरही बेतू शकते. 
  • स्वतःच्या मर्जीनं औषधे न घेता त्याऐवजी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि परिस्थिती आणखी खराब होण्यापूर्वीच उपचार करा. 
  • अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 
  • डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. 
  • आपला परिसर स्वच्छ ठेवावा.हेही वाचा -

फोर्ट इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अद्याप बचावकार्य सुरुच

कालच्या मुसळधार पावसात ‘इतक्या’ दुर्घटना मुंबईत घडल्यासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा