Advertisement

सावधान! येत्या आठवड्यात आणखी कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, आता राज्यभरात भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

सावधान! येत्या आठवड्यात आणखी कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, आता राज्यभरात भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच ही वाढती संख्या लक्षात घेता येत्या आठवड्यात ही आकडेवारी आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं राज्याचे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बुधवारी तर राज्यात २६ हजाराच्या घरात आणि मुंबईत १५ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून मुंबईतील आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी आकडेवारी आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वांचीच चिंता वाढली आहे. कारण रुग्ण वाढीचा दर झपाच्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सतर्कतेचा इशारा देणार पत्र लिहीले होते. 

या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय रुग्ण संख्या ही दोन लाखांवर जाऊ शकते आणि येणाऱ्या या तिसऱ्या लाटेत कोविड रुग्नांची संख्या ८० लाखांपर्यंत जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणेच आता रुग्ण वाढत असल्याने ही सर्व आकडेवारी खरी ठरू शकते याची शक्यता नाकारता येत नाही. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा