करोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदतकार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यात करोनामुळं उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळं आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
करोनाच्या प्रतिबंधासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना शासकीय यंत्रणांना सहकार्य, सहयोग करण्याची इच्छा असते. त्यांनी ccrmaharashtra.aid@gmail.com वर संपर्क साधावा. सरकारनं केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसायांच्या अनुषंगानं काही प्रश्न असतील तर त्यांनी ccrmaharashtra.ind@gmail.com वर संपर्क साधण्याचं आवाहन करोना नियंत्रण कक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
कुणाला कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित शंकांचं निरसन हवे असल्यास ccrmaharashtra.ind@gmail.com वर तर सरकारनं दिलेल्या निर्देशांबद्दल, आखलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीबद्दल स्पष्टीकरण हवे असल्यास ccrmaharashtra.policy@gmail.com वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
Coronavirus Updates: महाराष्ट्र लाॅकडाऊन! ५ हून अधिकजण रस्त्यावर फिरु नका
Coronavirus Updates: लोकल ट्रेन ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद