Advertisement

मुंबईत दिवसभरात ५५५ कोरोना रुग्ण वाढले ६६६ बरे झाले

मुंबईत रविवारी कोरोनाबाधित १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५५ नोंदविण्यात आली आहे, तर कोरोनामधून ६६६ रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या शून्य आहे.

मुंबईत दिवसभरात ५५५ कोरोना रुग्ण वाढले ६६६ बरे झाले
SHARES

मुंबईत रविवारी कोरोनाबाधित (Coronavirus) १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५५ नोंदविण्यात आली आहे, तर कोरोनामधून (covid 19) ६६६ रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या शून्य आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १२ जणांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ११ पुरुष रुग्ण होते, तर ४ महिला होत्या. ३ रुग्ण ४० वर्षांखालील होते. १० रुग्ण ६० वर्षांवरील होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटांतील होते.

मुंबईत ३४ हजार ९८० चाचण्या करण्यात आल्या असून, बरे झालेल्या रुग्णांचा प्रमाण ९६ टक्के आहे. ४ ते १० जुलैदरम्यान कोविड वाढीचा दर ०.०७ टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा दर ९२८ दिवस आहे. सक्रिय कंटेनमेंट झोन ५ असून, सक्रिय सीलबंद इमारती ६८ आहेत. जगाचे लक्ष वेधून राहिलेल्या धारावीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासकीय आणि सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात असून, याच प्रयत्नांना उल्लेखनीय यश येत आहे.

धारावीतील (dharavi) कोरोना रुग्णांची संख्या कधी शून्य, तर कधी २-१च्या आसपास आढळून येत असून, रविवारी धारावीत कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. मुंबई महापालिकेकडून धारावीत कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोठे काम केले जात आहे. यासाठी येथील नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेतली जात आहे. नागरिकांना सातत्यानं आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. यास उल्लेखनीय यश येत असून, कोरोना रुग्णांची संख्या शून्य ते ३च्या घरात आढळून येत आहे.

पुरेशा लसींच्या साठ्याअभावी ९ आणि १० जुलै रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार पुन्हा सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

मुंबई लोकल प्रवासासाठी आंदोलन

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा