Advertisement

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल

वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मेट्रो सेवा चालविणाऱ्या मुंबई मेट्रो वननं प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी या कार्डची सुविधा सुरू केली आहे.

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल
SHARES

मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गुरुवारी वन मुंबई मेट्रो कार्ड सेवेत दाखल केले आहे. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मेट्रो (mumbai metro) सेवा चालविणाऱ्या मुंबई मेट्रो वननं प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी या कार्डची सुविधा सुरू केली आहे. आता हे कार्ड मेट्रो प्रवासासाठी वापरता येणार असून, पुढे ते बेस्ट आणि लोकलसह उर्वरित वाहतूक सेवेसाठीदेखील वापरता येईल, असा दावा मुंबई मेट्रो वननं केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमच ई-बॅलेन्स आणि वॉलेट बेस्ड चिप बॅलन्ससह सामान्य कार्डप्रमाणे काम करणारे अनोखी चिप आधारित कार्ड सादर केलं गेलं आहे. अतिरिक्त पाकीट असलेली ही चिप भारतात प्रथमच ट्रान्झिट सिस्टमच्या वापरासाठी ट्रान्झिट सिस्टममध्ये आणली गेली. 

ई-बॅलन्सचा उपयोग खरेदी-विक्री, देयके आदी ऑनलाईन व्यवहारासाठी केला जाऊ शकतो. हे कार्ड कॉन्टॅक्टलेस किंवा टॅप-अँड-गो तंत्रज्ञानाच्या चाचणीनंतर सादर केले गेले आहे. हे तंत्रज्ञान जलद, संपर्करहित आणि कॅशलेस प्रवास सुनिश्चित करेल. जगातील कोठेही दिलेली डेबिट / क्रेडिट कार्ड मेट्रोवर स्वीकारता यावी यासाठी मुंबई मेट्रो वनच्या पुढाकारालाही यात जोड देण्यात आली आहे.



हेही वाचा -

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे नवीन ५४० रुग्ण

मुंबईत पावसाची हजेरी; मुंबईकरांना दिलासा


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा