Advertisement

मुंबईत पावसाची हजेरी; मुंबईकरांना दिलासा


मुंबईत पावसाची हजेरी; मुंबईकरांना दिलासा
SHARES

मुंबईत गुरूवार सकाळपासून मुसळधार पावसाने (mumbai rains) हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळं मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. शिवाय, सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या पावसामुळं अनेक त्रासांना समोर जावे लागत आहे.

मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून मुंबईतील किमान तापमानात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मुंबईकरांची घामाच्या धारांपासून आता मुक्तता होऊ शकेल. पुढील काही दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (IMD) दिले आहेत. येत्या शनिवार आणि रविवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई व ठाण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या शनिवार आणि रविवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई व ठाण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रायगडातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होऊ शकेल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा