Advertisement

खाद्यतेलांच्या किंमतीत मोठी वाढ


खाद्यतेलांच्या किंमतीत मोठी वाढ
SHARES

भारत खाद्य तेलाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नसल्यानं शेंगदाणा, वनस्पती, सोया, सूर्यफूल, पाम तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कोरोनाकाळात आयातीत घट झाल्याचाही हा परिणाम असल्याचं समजतं. कोरोनामुळं अर्थव्यवस्था कोंडलेली असताना देशभरातील नागरिक सध्या विविध वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळं त्रस्त आहेत. त्यातच खाद्यतेलांच्या किमतींमध्ये ११ वर्षांतील उच्चांकी वाढ नोंदविली गेली. खाद्यतेलांच्या दरवाढीबाबत सोमवारी अन्न व सार्वजनिक वितरण खात्यानं संबंधितांची बैठक घेतली, त्यात राज्यांना व खाद्यतेल उद्योगांना तेलाच्या किमती तातडीनं खाली आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.

२०१९-२०२० या वर्षात नोव्हेंबर-ऑक्टोबर या काळात भारतात वनस्पती तेलाचे उत्पादन ८५ लाख टन झाले तर १३.५ मेट्रिक टन तेल आयात केली गेली. त्यात ७ मेट्रिक टन पामतेल, ३.५ मेट्रिक टन सोयाबीन तेल व २.५ मेट्रिक टन सूर्यफूल तेल आयात करण्यात आले होते.

देशाची खाद्यतेलाची ६० टक्के मागणी ही आयातीतून भागवली जाते, त्यामुळे देशांतर्गत तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय दरावर ठरत असतात. कच्च्या पाम तेलाची किंमत मलेशियाच्या बाजारात २५ मे रोजी टनाला ३८९० रिंगीट (तेथील चलन) होती. ती वर्षापूर्वी २२८१ रिंगीट होती. सीबीओटीमध्ये सोयाबीन तेलाची किंमत २४ मे रोजी टनाला ५५९.५१ अमेरिकी  डॉलर होती. गेल्या वर्षीच्या याच काळात ही किंमत ३०६.१६ डॉलर होती.

पाम तेलाची किंमत सर्वाधिक वाढली असून किरकोळ किंमत किलोला मे महिन्यात १३१ रुपये ६९ पैसे होती. हा ११ वर्षांतील उच्चांक असून गेल्या वर्षी याच काळात ही किंमत ८८ रुपये २७ पैसे होती. मोहरीच्या तेलाचे किरकोळ दर मे महिन्यात १६४ रुपये ४४ पैसे होते तेच दर गेल्या मे महिन्यात ११८ रुपये २५ पैसे होते. शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफुलाच्या तेलाच्या दरांमध्ये या मे महिन्यात १९ ते ५२ टक्के दरवाढ झाली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा