Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत 1438 नवे रुग्ण, दिवसभरात 38 जणांचा मृत्यू

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 35 हजार 273 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात करोनाचे 763 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Coronavirus pandemic:  मुंबईत 1438 नवे रुग्ण, दिवसभरात 38 जणांचा मृत्यू
SHARES
Advertisement

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, राज्यात आज कोरोनाचे 85 जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात 1438 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत  गुरूवारी दिवसभरात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38 रुग्ण दगावले आहेत. तर 21 मे रोजी 41 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 22 मे रोजी रोजी एकूण 27 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे 1438 नवीन रुग्ण आढळले आहेत.


मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 35 हजार 273 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात  करोनाचे 763 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 9 हजार 817 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती


अतिदक्षता विभागातील(ICU) व्यवस्था - 645

व्हेंटिलेटरवर व्यवस्था-  373

सीसीसी 2 मधील व्यवस्था - 29740

डायलसिस उपकरणे - 92


मुंबईतील कंटेनमेंट झोनची माहिती


कंटेनमेंट झोन (चाळ आणि झोपडपट्टी) - 689

सीलबंद इमारती - 2908

अती जोखीम - 7764

कमी जोखीम 16, 719

सीसीसी 1 मधील अति जोखीम संपर्क - 54, 677

एकूण तपासणी शिबिर - 380

शिबिरात तपासलेले रुग्ण - 22515

एकूण घेतलेले नमूने - 5452

आढळलेले पाँझिटिव्ह रुग्ण - 392

संबंधित विषय
Advertisement