Advertisement

Clusters in Ambernath: ‘हे’ आहेत अंबरनाथमधील क्लस्टर झोन

अंबरनाथमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने शहरात ३० जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

Clusters in Ambernath: ‘हे’ आहेत अंबरनाथमधील क्लस्टर झोन
SHARES

अंबरनाथमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने शहरात ३० जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मंगळवार २३ जून २०२० पासून हा लाॅकडाऊन सुरू होणार आहे. यासंबंधीचा आदेश नगरपरिषदेकडून जारी करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत.

अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रामध्ये रविवार २१ जून २०२० पर्यंत ११३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी दिवसभरात ३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९९ रुग्णांवर रुग्णालयात आणि १९४ रुग्णांवर घरी उपचार (home quarantine) सुरू आहेत. ५१७ कोरोनाबाधित रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे २९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत शहरात १९ क्लस्टर्स (Clusters zone in Ambernath) आहेत.

हेही वाचा - आता अंबरनाथमध्येही ३० जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन

या क्लस्टर्सची यादी पुढीलप्रमाणे:

  • झोन- १ बुआपाडा, भास्कर नगर, सायकल कंपनीजवळ, अंबरनाथ (पश्चिम), अंबरनाथ पोलीस स्टेशन
  • झोन- २ बी/कॅबिन, मोतीराम पार्क/ इंद्र विहार/ आनंद विहार, ताडवाडी/ हाल्याचा पाडा/ भवानी चाळ, अंबरनाथ (पूर्व)   
  • झोन- ३ न्यू काॅलनी/ चिंचपाडा/ नवरे पार्क/ जावसई/ पटेल प्लॅनेट/ शंकर हाईट्स/ कोहाज गाव/ फादर अॅग्नेल स्कूल/ आॅर्डनन्स एफ-१ टाईप क्वार्टर, मोहन सबब्रिया, दुबई काॅलनी, अंबर रेसिडेन्सी/ डी.एच.पाटील काॅलनी, अंबरनाथ (पश्चिम), पटेल प्लेनेट
  • झोन- ४ सत्यम एलिगेंजा/ श्रीपत अवधूत सोसायटी/ सत्यम आॅलिएंडर सर्वोदय नगर/ जांभूळ फाटा/ फाॅरेस्ट नाका, अंबरनाथ (पश्चिम)
  • झोन- ५ धारा रेसिडेन्सी/ लॅंडस्केप गार्डन/ रिलायन्स व साई रेसिडेन्सी/ पालेगाव, जुना अंबरनाथ गाव, अंबरनाथ (पूर्व), गोल्ड मेरी, पटेल एलियास
  • झोन- ६ वडवली सेक्शन/ आंबेडकर नगर/ शिवाजी नगर/ गावदेवी मंदिर जवळ/ खेर सेक्शन/ श्रीपाद बिल्डिंग/ योगेश सोसायटी, अंबरनाथ (पूर्व), रोट्री क्लब
  • झोन- ७ शिवगंगा नगर/ कैलास कुंज, अंबरनाथ (पूर्व)
  • झोन- ९ महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड/ शिवनगर/ शास्त्रीनगर, अंबरनाथ (प)   
  • झोन- १० कैलाश नगर, अंबरनाथ (पूर्व)
  • झोन- ११ मोरिवली पाडा, जयदिप टाॅवर, अंबरनाथ (पूर्व)
  • झोन- १२ भास्कर नगर, खुंटवलीवरचा पाडा, भवानी चौक, शिवलींग नगर, वुलन चाळ, दीपक नगर, संजय नगर, मेटल नगर, न्यू बालाजी नगर, जुना बालाजी नगर, गणेश नगर, खामकरवाडी, मुरलीधर नगर, मातोश्री नगर, नारायण नगर, अंबरनाथ (पश्चिम)
  • झोन- १३ राधेगोविंद नगर, अंबरनाथ (पूर्व)
  • झोन- १४ ग्रीन सिटी/ महालक्ष्मी नगर/ नवरे/ नावी नगर/ पाठारे पार्क/ जोंधळे पाॅलिटेक्निकजवळ/ कृष्णा नगर/ राॅयल पार्क/ निसर्ग ग्रीन, अंबरनाथ (पूर्व)
  • झोन- १५ लादी नाका/ फाॅरेस्ट नाका/ मोरीवली गाव/ नवीन भेंडीपाडा, अंबरनाथ (पश्चिम)  
  • झोन- १६ स्वामी नगर/ सिद्धार्थ नगर/ कैलास नगर/ फातिमा काॅलनी/ बेतल चर्च/ गौतम नगर/ वांद्रा पाडा/ जुना भेंडीपाडा/ सुभाष वाडी, अंबरनाथ (पश्चिम), बांगडी गल्ली
  • झोन- १७ फरमिंग सोसायटी/ लोक नगरी/ एमआयडीसी एरिया, अंबरनाथ (पूर्व)
  • झोन- १८ पनवेलकर कॅम्पस/ लखमबले नगर, कमलाकर नगर, भोपीवाडी, अंबरनाथ (पश्चिम)
  • झोन- १९ कानसई सेक्शन/ साई सेक्शन/ दत्त मंदिर/ भिम नगर, शिवधाम काॅम्प्लेक्स, अंबरनाथ (पूर्व)
  • झोन- २० म्हाडा काॅलनी, एनएमआरएल काॅम्प्लेक्स अंबरनाथ (पूर्व)

हेही वाचा - कांदिवली, बोरीवली, दहिसरमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा वेग 'इतका'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा