Advertisement

लॉकडाउनचा कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका

या लॉकडाऊनमुळं अनेकांना फटका बसला असून, कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

लॉकडाउनचा कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका
SHARES

कोरोनामुळं राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं अनेकांना फटका बसला असून, कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे. देशभरात मागणीत घट झाल्यानं दीड महिन्यात कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चातही मोठी घट झाली आहे.

कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यभरातील बाजार समित्यांचे कामकाजही प्रभावित झाल्याने खरेदीत अडथळे येत आहेत. एकप्रकारे लॉकडाउन कांद्याच्या मुळावर आले आहे. कोरोना रुग्ण आढळल्यानं आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ मे पासून लिलाव बेमुदत बंद करण्यात आले आहेत.

हेही वाचा - चिंताजनक! मुंबईत कोरोनाने आतापर्यंत 508 जणांचा घेतला बळी, 875 नवे रुग्ण

२४ मार्चला देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यापूर्वी २३ मार्चला लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे क्विंटलमागे सर्वसाधारण भाव १,२५० रुपये होते. ते ६ मे रोजी थेट निम्म्यावर म्हणजे ६३० रुपयांवर आले. त्यातच कोरोनामुळं ११ मे पासून ७ दिवस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे.

मागील वर्षी राज्यात ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर झालेल्या लागवडीत यंदा वाढ होऊन कांद्याचे क्षेत्र तब्बल ५ लाख ८० हजार ३१९ हेक्टर झाले आहे.



हेही वाचा -

१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार

एपीएमसी मार्केट ११ मे पासून बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा