Advertisement

हॉटेल्स सुरू, पहिल्या दिवशी फक्त 'इतक्या' ग्राहकांचा प्रतिसाद


हॉटेल्स सुरू, पहिल्या दिवशी फक्त 'इतक्या' ग्राहकांचा प्रतिसाद
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ३ महीने मुंबईतील सर्व व्यवसाय, बाजारपेठ, दुकानं, हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीनं सरकारनं लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनमुळं सर्व बंद असलेली यंत्रणा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नुकताच राज्यभरात दुकान, सलून सुरु झाली असून, आता हॉटेल्स ही सुरु करण्यात आले आहेत. राज्यात बुधवारपासून सरकारच्या कार्यपद्धतीनुसार हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कामगारांच्या तुटवड्यामुळं केवळ ५ टक्केच ग्राहकांनी प्रतिसाद दिला.

कामगारांचा तुटवडा आणि ग्राहकांचा अभाव यामुळे राज्यात पहिल्या दिवशी बुधवारी केवळ ३० ते ३५ टक्के हॉटेल्स सुरू झाली. तर ५ टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे.

बुधवारपासून मिशन बिगीन अगेन अंतर्गत हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परवानगीनुसार ३३ टक्के क्षमतेने हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. मात्र, अशा प्रकारे हॉटेल सुरू करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. कारण हॉटेल क्षेत्रातील एकूण कामगारांपैकी ७० टक्के कामगार हे स्थलांतरित आहेत. त्यांना परत येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. कामगारांअभावी अनेक हॉटेलचालकांना हॉटेल्स सुरू करता आलेली नाहीत.

काही हॉटेल चालकांनी सावध पवित्रा घेतला आहे. सुरू झालेल्या हॉटेल्सना कसा प्रतिसाद मिळतो यावरून ते निर्णय घेणार आहेत. अनेक हॉटेलचालकांकडे पैसे नसल्याने त्यांनी हॉटेल्स बंद ठेवली आहेत. परंतु किती हॉटेल्स सुरू होणार आहेत याबाबतचे चित्र एक ते दोन आठवड्यांत स्पष्ट होईल. हॉटेलमध्ये ग्राहकांना जेवण देताना युज अ‍ॅण्ड थ्रो प्लेटमध्ये जेवण दिले जाते.

हॉटेल सेवा

  • एखाद्या ग्राहकाला हॉटेलमध्ये जायचे असेल तर त्यापूर्वी त्याला ऑनलाइन सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो. 
  • संबंधित व्यक्ती परदेशी नागरिक आहे का? किंवा व्यावसायिक कारणासाठी की क्वारंटाइन होण्यासाठी? हे पाहिले जाते. 
  • गेल्या १५ दिवसांत ग्राहक कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले का? तेही विचारले जाते. 
  • हॉटेलमध्ये येताना गेटवर दोनवेळा स्क्रीनिंग आणि निर्जंतुकीकरण केले जाते. 
  • ग्राहकाच्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाते. 
  • पेमेंट ऑनलाइन करण्यात येते. त्यामुळे संपर्क टाळता येतो. त्यानंतर ग्राहकाला हॉटेलमध्ये प्रवेश दिला जातो.



हेही वाचा - 

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा