Advertisement

चि. कोरोना व चि.सौ.का. मृत्यूबाई यांच्या लग्नाची पत्रिका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही सामाजिक संस्था आपापल्यापरीने जनजागृतीचे काम करत आहेत.

चि. कोरोना व चि.सौ.का. मृत्यूबाई यांच्या लग्नाची पत्रिका
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही सामाजिक संस्था आपापल्यापरीने जनजागृतीचे काम करत आहेत. यातच सद्या एका लग्न पत्रिकेने समाज माध्यमावर साऱ्याचे लक्ष वेधून घेतले असून या पत्रिकेच्या माध्यमातून कोरोनाबाबत आगळ्या पद्धतीने जनजागृती करण्याचे काम केले आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच अचानकपणे काही दिवसापासून रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. सरकारही निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग पाळा, सेनेटाईज वापरा अशा सूचना आणि जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. सध्या लग्न समारंभांचे दिवस सुरू असल्याने समाजमाध्यमावर एक वेगळी लग्न पत्रिका फिरत आहे. त्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय काळजी घेण्यात यावी यास्वरुपाचा मजकूर आहे.

नक्की काय लिहलंय या पत्रिकेत?

आमच्या येथे यमराज कृपेनं एका विषाणूचा संसर्ग झाला आहे. तरी वरील विषाणू भारतातून हकालपट्टीसादर आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. 

वर चि. कोरोना यांचा शुभ विवाह चि. सौ. का. मृत्यूंबाई 

जा जा पत्रिका मार भरारी, जाऊन सांग सोयऱ्यांच्या घरी 

विषाणूचा संसर्ग आहे फार जहरी, सर्वजण रहा आपापल्या घरी 

तरी आपण सहकुटुंब सहपरिवार घरातच राहावे हि विनंती 

आपले विनीत

  • आरोग्यविभाग केंद्र सरकार, भारत 
  • आरोग्य विभाग , राज्य सरकार , महाराष्ट्र 
  • वरील विनंतीस मान देऊन घरात राहून सहकार्य करावे हि विनंती 
  • समस्त जिल्हा प्रशासन,तालुका प्रशासन 
  • ग्रामपंच्यायत कार्यालय, महारष्ट्र 
  • मुंबई, पालघर. रायगड, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

विवाह मुहूर्त

संसर्ग जनी व्यक्तीच्या संपर्कात                                

विवाह स्थळ  

सर्व गर्दीच्या जागा 

आमच्या मामाच्या लग्नाला यायचं ह 

चि. ताप , चि. खोकला, कु. सर्दी, कु. महामारी 

टीप - प्रत्येकाने शुभ आरोग्यासाठी मास्क व सानेट्झर वापरणे तसेच आपापसात २ मीटर अंतर ठेवणं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा