Advertisement

Coronavirus Updates: कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई विद्यापीठाचा सरकारला मदतीचा हात


Coronavirus Updates: कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई विद्यापीठाचा सरकारला मदतीचा हात
SHARES

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी विविध संस्था पुढे येत आहेत. अशातच आता मुंबई विद्यापीठानंही मदतीचा हात पुढे केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई विद्यापीठातील वसतीगृहं तसंच, इतर काही इमारतींचा वापर विलगीकरण किंवा अन्य कारणासाठी करता येणार आहे. यासाठी विद्यापीठ परिपूर्ण सहकार्य करणार असल्याचं पत्र मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलं आहे.

मुंबईत करोनाची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून, गुरूवारी आतापर्यंत सर्वाधिक संख्या नोंदविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. तसंच, सरकारला विविध स्तरावरून मदतीचे हात येऊ लागले आहे. यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनीही सरकारला विद्यापीठ स्तरावरून आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विविध संस्था मदत करत आहेत. प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरानं देखील मदतीचा हात दिला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा