Advertisement

Coronavirus Updates: देशभातील रुग्णांची संख्या ३०७२ वर


Coronavirus Updates: देशभातील रुग्णांची संख्या ३०७२ वर
SHARES

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज १५-२० अशा संख्येनं रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार, भारतात आतापर्यंत ३०७२ लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. यांपैकी २१२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत एकूण ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही सर्वाधिक ६३५ रुग्ण असून जळगावमध्ये रात्री उशिरा २ संशयितांचा मृत्यू झाला आहे. या दोघांवर शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते.

देशातील इतर शहरांपैकी मुंबईत सर्वाधिक लोक हे झोपडपट्टीत राहतात. १० बाय १०च्या खोलीत राहणाऱ्या या लोकांना घरात क्वॉरंटाइन करणं शक्य नसल्यानं त्यांना क्वॉरंटाइन करता यावे यासाठी महापालिकेनं शाळा, हॉस्पिटल, समाज हॉल आणि लग्नाचे हॉल ताब्यात घेतले असून या ठिकाणी संशयितांना क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. त्याशिवाय मुंबई पालिकेने करोनावर उपचार करण्यासाठी डेडिकेटेड रुग्णालयेही सुरू केले आहेत.

दिल्ली लगत असलेल्या एनसीआर परिसरातही तीव्र गतीने पसरत आहे. शनिवारी एनसीआरमध्ये ४३ रुग्ण आढळले. दिल्लीत २४ तासांमध्ये ५९ नवे रुग्ण आढळले.  


विविध राज्यांमधील करोनाग्रस्तांची संख्या


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा