Advertisement

राज्यात २१ हजार ९०७ नवे रुग्ण, ४२५ जणांचा दिवसभरात मृत्यू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५३ टक्के) आले आहेत

राज्यात २१ हजार ९०७ नवे रुग्ण, ४२५ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २३ हजार ५०१ एवढ्या विक्रमी संख्येने  रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५३ टक्के) आले आहेत. राज्यात  १८ लाख  ०१ हजार १८० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ८३१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७१ टक्के एवढा आहे.

 

आज निदान झालेले २१,९०७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४२५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२११ (५०), ठाणे- ३३७ (१७), ठाणे मनपा-४०२ (१), नवी  मुंबई मनपा-४०६ (८), कल्याण डोंबिवली मनपा-४७१ (१), उल्हासनगर मनपा-५२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३७ (१), मीरा भाईंदर मनपा-१९२ (८), पालघर-१९९ (३), वसई-विरार मनपा-२५५ (७), रायगड-४५६ (१५), पनवेल मनपा-२१० (१), नाशिक-३८६ (१), नाशिक मनपा-११४१ (६), मालेगाव मनपा-१७ (१), अहमदनगर-७४४ (८),अहमदनगर मनपा-१८६ (३), धुळे-४४, धुळे मनपा-६०(१), जळगाव-५९७ (७), जळगाव मनपा-११९ (२), नंदूरबार-११३ (२), पुणे- १३६६ (१२), पुणे मनपा-१७४५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (४), सोलापूर-५३८ (१६), सोलापूर मनपा-६७, सातारा-७६७ (२६), कोल्हापूर-५२७ (२०), कोल्हापूर मनपा-१७९ (५), सांगली-६६२ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२९० (९), सिंधुदूर्ग-६० (३), रत्नागिरी-३३५ (४), औरंगाबाद-१८२ (७),औरंगाबाद मनपा-३५१ (७), जालना-१२७, हिंगोली-५९, परभणी-६२ (३), परभणी मनपा-३८ (३), लातूर-२१७ (४), लातूर मनपा-८५ (१), उस्मानाबाद-२५८ (५), बीड-१६९ (४), नांदेड-१९१ (३), नांदेड मनपा-२१७ (१), अकोला-१०९ (५), अकोला मनपा-१३० (८), अमरावती-११८ (१), अमरावती मनपा-१८८, यवतमाळ-३४८ (१३), बुलढाणा-१२७ (१), वाशिम-४२ (२), नागपूर-४७७ (१४), नागपूर मनपा-१५६९ (२२), वर्धा-९७ (३), भंडारा-२०२ (११), गोंदिया-२३३ (१), चंद्रपूर-९० (१), चंद्रपूर मनपा-७० (३), गडचिरोली-३० (२), इतर राज्य- ३१ (१).

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,८२,२०३) बरे झालेले रुग्ण- (१,४२,७६९), मृत्यू- (८४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,६३९)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१,६८,८०५), बरे झालेले रुग्ण- (१,३४,७०२), मृत्यू (४४८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,६१६)

पालघर: बाधीत रुग्ण- (३३,४१७), बरे झालेले रुग्ण- (२६,५१७), मृत्यू- (७६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१३२)

रायगड: बाधीत रुग्ण- (४५,५३९), बरे झालेले रुग्ण-(३५,०११), मृत्यू- (१००२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५२४)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (७४३०), बरे झालेले रुग्ण- (४२१६), मृत्यू- (२०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०१३)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२९९२), बरे झालेले रुग्ण- (१६३७), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२९८)

पुणे: बाधीत रुग्ण- (२,५७,४०९), बरे झालेले रुग्ण- (१,७२,७३२), मृत्यू- (५१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९,४८९)

सातारा: बाधीत रुग्ण- (२९,२६७), बरे झालेले रुग्ण- (१९,८७५), मृत्यू- (७२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६६७)

सांगली: बाधीत रुग्ण- (३०,७४६), बरे झालेले रुग्ण- (१९,०४९), मृत्यू- (९३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,७६७)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (३६,७७४), बरे झालेले रुग्ण- (२७,४१८), मृत्यू- (१०९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२६३)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (३०,७५८), बरे झालेले रुग्ण- (२२,४४०), मृत्यू- (१०३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२७९)

नाशिक: बाधीत रुग्ण- (६२,२५१), बरे झालेले रुग्ण- (४८,१२७), मृत्यू- (११३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,९९२)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३४,७८७), बरे झालेले रुग्ण- (२५,१५६), मृत्यू- (५५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(९०७८)

जळगाव: बाधीत रुग्ण- (४२,०४१), बरे झालेले रुग्ण- (३२,२१८), मृत्यू- (१११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७०८)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४५६०), बरे झालेले रुग्ण- (३२६८), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८१)

धुळे: बाधीत रुग्ण- (११,५३९), बरे झालेले रुग्ण- (९७६५), मृत्यू- (२८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४८४)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३१,९७९), बरे झालेले रुग्ण- (२२,९४६), मृत्यू- (८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२२०)

जालना: बाधीत रुग्ण-(६५७७), बरे झालेले रुग्ण- (४५२५), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८७५)

बीड: बाधीत रुग्ण- (८४२२), बरे झालेले रुग्ण- (५२२३), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२९७१)

लातूर: बाधीत रुग्ण- (१४,३२८), बरे झालेले रुग्ण- (१०,२३७), मृत्यू- (४०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६८२)

परभणी: बाधीत रुग्ण- (४६०७), बरे झालेले रुग्ण- (२९६३), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४९५)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२४०१), बरे झालेले रुग्ण- (१८५८), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९४)

नांदेड: बाधीत रुग्ण- (१३,१८५), बरे झालेले रुग्ण (६३६०), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४८६)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१०,२०७), बरे झालेले रुग्ण- (६८९७), मृत्यू- (२६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०४४)

अमरावती: बाधीत रुग्ण- (१०,४०३), बरे झालेले रुग्ण- (८००१), मृत्यू- (२१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१९०)

अकोला: बाधीत रुग्ण- (६१८५), बरे झालेले रुग्ण- (३९०६), मृत्यू- (१९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०८०)

वाशिम: बाधीत रुग्ण- (३२७९), बरे झालेले रुग्ण- (२५१८), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९७)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (६२४०), बरे झालेले रुग्ण- (३९५९), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१७७)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (६६६१), बरे झालेले रुग्ण- (३८५४), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६५९)

नागपूर: बाधीत रुग्ण- (६२,०९४), बरे झालेले रुग्ण- (३८,७६९), मृत्यू- (१६२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(५), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१,६९८)

वर्धा: बाधीत रुग्ण- (२७५०), बरे झालेले रुग्ण- (१७५४), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६४)

भंडारा: बाधीत रुग्ण- (३८७०), बरे झालेले रुग्ण- (१७९०), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०१५)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (४३१३), बरे झालेले रुग्ण- (२६६७), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५९७)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (७२६५), बरे झालेले रुग्ण- (३२९२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९०७)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१४८३), बरे झालेले रुग्ण- (१०८६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९२)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१२४८), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०७)

एकूण: बाधीत रुग्ण-(११,८८,०१५) बरे झालेले रुग्ण-(८,५७,९३३),मृत्यू- (३२,२१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३८६),ॲक्टीव्ह रुग्ण-(२,९७,४८०)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४२५ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४८ मृत्यू सातारा -८, औरंगाबाद -७, नागपूर -७, पुणे -४, ठाणे -४, पालघर -४, यवतमाळ -३, कोल्हापूर -३, नांदेड -२, सांगली -२, अहमदनगर -१, चंद्रपूर -१, रत्नागिरी -१ आणि वर्धा -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ठाणे जिल्हा आणि जिल्ह्यामधील महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या मृत्यूंचे  रुग्णांच्या रहिवासी पत्त्यानुसार जिल्हांतर्गत बदल केल्याने ठाणे जिल्हा आणि जिल्ह्यातील मनपा यांच्या मृत्यूसंख्येत बदल झाला आहे तथापी ठाणे जिल्ह्याच्या एकूण मृत्यूसंख्येत कोणताही बदल झालेला नाही. आज जिल्हा आणि मनपा निहाय ५ सप्टेंबर  २०२० पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येत १३८८ रुग्णांची घट झाली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा