Advertisement

धक्कादायक! अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोना


धक्कादायक! अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोना
SHARES
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच असतानाच, कोरोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात येणा डाँक्टरांमध्ये हा संसर्ग आता फोफावत आहे. आधीच नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या 1328 पोलिस कर्मचाऱ्यांना या संसर्गाने विळखा घातला असताना. मुंबईत कोरोनाच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 73  नवोदीत डाँक्टरांना कोरोना झाल्याचे पुढे आल्याने चिंतेचे वातावरण आहे.



मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात डाँक्टर, नर्स, आरोग्य विभाग, पालिका कर्मचारी आणि पोलिस शर्तीचे प्रयत्न करत आहे. माञ सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहेत ते डाँक्टर आणि नर्स ... कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी डाँक्टरांची संख्या कमी पडू लागल्यानंतर शासनाने नवोदित वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या केईएम, सायन आणि नायर मेडिकल काँलेजमध्ये डाँक्टरेडचे शिक्षण घेणाऱ्या पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या लढ्यात डाँक्टरांच्या मदतीसाठी उतरवले.  माञ न कळत डाँक्टर ही या संसर्गाला आता बळी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयात कोरोनाची बाधा झालेल्या डाँक्टरांची संख्या 42 इतकी झाली आहे. आवश्यक तितके पीपीई किट्स उपलब्ध न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे डाँक्टरांनाकडून आता सांगितले जात आहे.
सध्या  परिस्थिती गंभीर  असून डाँक्टरांच्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष घालत, त्यांना हव्या त्या सुविधा पुरवणे गरजेचे आहे.


दरम्यान कांदिवलीच्या समतानगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. या सर्वाना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या मुंबई पोलिस दलातील 618 पोलिस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले असून 9 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा