Advertisement

'रिचर्डसन ॲण्ड क्रूडास' कंपनीत 800 बेडचे कोरोना सेंटर, पालकमंञी अस्लम शेख कडून कोरोना सेंटरची पाहणी


'रिचर्डसन ॲण्ड क्रूडास' कंपनीत 800 बेडचे कोरोना सेंटर, पालकमंञी अस्लम शेख कडून कोरोना सेंटरची पाहणी
SHARES
भायखळा येथील रिचर्डसन ॲण्ड क्रूडास कंपनीच्या जागेवर निर्माणाधीन असलेल्या कोरोना काळजी केंद्र (जम्बो फॅसिलिटी) व्यवस्थेची राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी रविवारी पाहणी केली. या केंद्रात सुमार 800 खाटा रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून त्यातील 300 खाटा या आँक्सीजन पुरवठा होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश  काकाणी  यांनी पालकमंत्री शेख यांना कोरोना सेंटर केंद्राबाबत सविस्तर तपशील दिला. कोरोना बाधितांसाठी पालिकेने रिचर्डसन ॲण्ड क्रूडास कंपनीच्या सुमारे ७० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर आठवडाभरात ८०० 
खाटांचे क्वारन्टाइन सेंटर उभारले आहे. या केंद्राचे वैशिष्ठ म्हणजे या केंद्रातील 800 पैकी ३०० खाटांसोबत रुग्णांना ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. याच ठिकाणी स्वतंत्रपणे भोजनगृहाची देखील सोय असून त्याद्वारे रुग्णांना दैनंदिन अल्पोपहार, जेवण आदी पुरवले जाईल. तसेच पिण्याचे गरम मिळावे, यासाठी यंत्रे पुरवली जाणार आहेत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा अशी व्यवस्था असणार आहे. या केंद्रातील रुग्णांसाठी पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र निवास आदी व्यवस्था करण्यात येत आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.  मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, मुंबईत 24 तासात कोरोनाचे 39 जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मुंबईत  दिवसभरात 1725 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत  रविवारी दिवसभरात मृतांचा आकडा 988 वर पोहचला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा