Advertisement

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ


राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ
SHARES

राज्यात आज पुन्हा एकदा दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली. राज्यात २ हजार १४९ नवीन करोनाबाधित आढळले, तर १ हजार ८९८ रूग्ण कोरोनामधून बरे झाले. तसेच, २९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१५,३१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,८८,४२९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९७३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०८,०९,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८८,४२९(१०.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२७,४६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,००२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २९,७८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा