Advertisement

लॉकडाऊनमध्ये अडकलेली धारावी

सध्या धारावीत चालणारे व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहेत. अनेकांची घरं इथल्या व्यवसायावर चालतात. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपायमारीची वेळ आली आहे.

SHARES

धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. पण सध्या कोरोना विषाणूचं धारावी हे हॉटस्पॉट ठरत चाललं आहे. या परिस्थितीत धारावी परिसर सील करण्यात आला आहे. इथले उद्योगधंदे ठप्प झालेत. जगणंही मुश्किल झालंय. गरजूंच्या खाण्यापिण्याची सोय प्रशासन करतंय. पण मोठी अडचण ठरतेय ती टॉयलेटपासून इतर सार्वजनिक स्वच्छतेची. दाटीवाटीच्या या वस्तीत सोशल डिस्टन्ससिंग पाळण्याचं आव्हानही मोठं कठीण आहे.

सध्या धारावीत चालणारे व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहेत. अनेकांची घरं इथल्या व्यवसायावर चालतात. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपायमारीची वेळ आली आहे. मुंबई लाइव्हनं धारावीत हिच परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओत लॉकडाऊन दरम्यान धारावीतील व्यवसायावर कसा परिणाम झाला? हेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.






संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा