पश्चिम उपनगरात बाल रुग्णालयाची गरज

 Goregaon
पश्चिम उपनगरात बाल रुग्णालयाची गरज

गोरेगाव - मुंबईतील पश्चिम उपनगरात लहान मुलांचे रुग्णालय नाही. येथील नागरिकांना मुलांना उपचारासाठी परळ येथील वाडिया रुग्णालयात घेऊन जावे लागते. त्यामुळे पश्चिम उपनगरात लहान मुलांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.

पश्चिम उपनगरात भगवती, कुपर ही मोठी रुगणालये आहेत. पण या रुग्णालयात लहान मुलांवर उपचार होत नाहीत. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना मुलांना उपचारासाठी वाडिया रुग्णालयात घेऊन जावे लागते. पण दहिसर आणि विरार येथून आजारी मुलांना येथे आणेपर्यंत लहान मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तसेच बड्या रुग्णालयांचा खर्च सर्वसामान्यांना परवडू शकत नाही. त्यामुळे पालिकेने लवकर निर्णय घेऊन लहान मुलांच्या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी प्रमिला शिंदे यांनी केली आहे.

Loading Comments