वीज आणि पाण्यासाठी उपोषण

 Mumbai
वीज आणि पाण्यासाठी उपोषण
वीज आणि पाण्यासाठी उपोषण
वीज आणि पाण्यासाठी उपोषण
See all

देवनार - येथे खासगी जागेत राहणारे झोपडीधारक 30 वर्षांपासून वीज आणि पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक दिनेश पांचाळ यांनी संबंधित अधिकारी आणि डेव्हलपरनाही निवेदन दिलं. पण त्यांच्या तक्रारीवर कुठलीही दाद देण्यात आलेली नाही. अखेर दिनेश पांचाळ यांनी उपोषणाचं हत्यार उचललं आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून दिनेश पांचाळ, त्यांचे कार्यकर्ते आणि रहिवासी बेमुदत उपोषणाला बसलेत. वीज आणि पाण्याची समस्या सुटत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

Loading Comments