चेंबूरमधला खड्डा ठरतोय अपघाताला निमंत्रण

 Chembur
चेंबूरमधला खड्डा ठरतोय अपघाताला निमंत्रण
चेंबूरमधला खड्डा ठरतोय अपघाताला निमंत्रण
See all

चेंबूर - रस्त्याच्या मधोमध असलेलं मॅनहोलचं झाकण तुटल्यानं चेंबूरच्या सुस्वागतमनगर परिसरातल्या मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून रस्त्यावरचं हे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. याच परिसरात बी. डी. एस शुक्ला हायस्कूलही आहे. त्यामुळे साहजिकच शाळा भरण्या-सुटण्याच्या वेळेस इथे जास्त गर्दी होते. सध्या हे मॅनहोल कसंबसं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यावरच महापालिकेला जाग येईल का, असा सवाल रहिवाशांना पडला आहे.

Loading Comments