लालबाग फ्लायओव्हर झालाय धोकादायक

लालबाग - लालबागचा फ्लायओव्हर... खालचा रस्ता आरपार दिसावा अशा रीतीनं या पुलावरचा गर्डर सरकलाय. याला खड्डा म्हणायचं, दरी म्हणायचं की आणखी काही. तुम्हीच ठरवा. पण फक्त 5 वर्षांतच पुलाची झालेली ही अवस्था धक्कादायक आहे आणि धोकादायकही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तब्बल 12 तासांनी महापालिका आणि एमएमआरडीएनं दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. पुढचे दोन दिवस अवजड वाहनांना या पुलावरून जाण्यास बंदी घालण्यात आलीय. फक्त हलकी वाहनंच या पुलावरून सोडण्यात येतायत. बुधवारी एका कारचालकाच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यानं तत्काळ कंट्रोल रुमला माहिती दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काही महिन्यांपूर्वीच या पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले होते. त्यानंतर आता पडलेल्या या आरपार खड्यानं पुलाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. सत्ताकारणात नेहमीच मग्न असलेल्या राजकीय पक्षांना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला कधी वेळ मिळणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

Loading Comments