Advertisement

अमर महल पुलावरून क्रेन कोसळली


अमर महल पुलावरून क्रेन कोसळली
SHARES

गेल्या चार महिन्यांपासून ज्या अमर महल पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, ते काम सुरू असतानाच शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एक क्रेन वरच्या पुलावरून खाली कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अमर महल पुलाच्या खाली ही मशीन कोसळली. त्यामुळे या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पण टिळक नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

यावेळी पुलाखालून जाणारी वाहतूक सिग्नल असल्याने थांबलेली होती. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या मशीनच्या चालकाने बचावासाठी त्या क्रेनमधून उडी मारली. त्यामुळेच आज त्याचा जीव वाचला.

मंगेश बनसोडे, प्रत्यक्षदर्शी

पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूरमधील अमर महल जंक्शन उड्डाणपुलाच्या मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या भागावरील अँगलचे नटबोल्ट निखळले होते. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. अमर महल जंक्शन हा महत्त्वाचा उड्डाणपूल असून ठाणे-चेंबूरवरून इस्टर्न फ्री-वे ला जाण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वाचा मानला जातो.



हेही वाचा

अमर महल उड्डाणपूल दुरूस्तीचा पेच


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा