Advertisement

समाजकल्याण कार्यालयासमोर खड्डे


समाजकल्याण कार्यालयासमोर खड्डे
SHARES

चेंबूर - चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या समाजकल्याण कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या नोंदणी कार्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, शिधावाटप कार्यालय आणि शिक्षण विभागाची कार्यालये आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची मोठी ये-जा असते. पावसाळा सुरू झाल्यापासून येथील रस्त्यावर खड्डे पडले असून, खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे या कार्यालयात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. येथे एवढी शासकीय कार्यालये असूनही या खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा