SHARE

सांताक्रुझ - सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्ट्या दुरुस्तीच्या कारणास्तव ३१ आॅक्टोबरपासून दररोज पाच तास बंद ठेवण्यात येणार आहेत .०९-२७ आणि १४-३२ या क्रमांकाच्या धावपट्ट्यांचे विशिष्ट तंत्रज्ञानाने काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ३१ आॅक्टोबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत दररोज पाच तास या धावपट्ट्यांचे काम सुरु राहणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या