Advertisement

सीएसटी परिसरातील सबवेच्या छताचे रुप पालटणार


सीएसटी परिसरातील सबवेच्या छताचे रुप पालटणार
SHARES

ऐतिहासिक ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि महापालिका मुख्यालय या दोन्ही इमारती आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात. लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि महापालिका मुख्यालय यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गावरील छताचे रुपडे पालटणार आहे. या भुयारी छतावर पॉलिकार्बोनेट रुफ शीट असून स्टील फ्रेम तयार करून काचेचे छत तयार करण्यात येणार आहे.

सध्या छतावर असलेल्या पॉलिकार्बोनेट रुफ शीटमुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पालिका मुख्यालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग झाकला जातो. या ऐतिहासिक इमारतींचा दर्शनी भाग स्पष्ट दिसावा यासाठी काचेचे छत बसवण्यात येणार आहे. या कामासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. या भुयारी मार्गांच्या छताचे रुपडे पालटण्यासाठी 2 कोटी 87 लाख 16 हजार रुपये खर्च येणार आहे. स्वच्छ भारत अभियानांंतर्गत केंद्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी टर्मिनसची 10 प्रेक्षणीय स्थळांमध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच हे स्थानक हेरिटेजमध्ये मोडत असल्यामुळे या छताच्या बदलासाठी हेरिटेज विभागाकडूनही परवानगी घेण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा