Advertisement

घाटकोपरमध्ये इमारत कलंडली, रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले


घाटकोपरमध्ये इमारत कलंडली, रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले
SHARES

घाटकोपरमधील दामजी सदन नावाची इमारत सायंकाळच्या सुमारास कलंडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून या इमारतीतील सर्व रहिवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.



घाटकोपर पूर्वेकडील रायगड चौकात दोन मजली दामजी सदन इमारत आहे. ही इमारत सायंकाळी सहा - साडेसहा वाजेच्या सुमारास उजव्या बाजूला कलंडल्याचे काही रहिवाशांच्या निदर्शनास आले.



या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या एन विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचारी आणि पोलीस यांच्या मदतीने सुरक्षेचा उपाय म्हणून रहिवाशांना त्वरीत बाहेर काढण्यात आले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा