भारतीय रेल्वेत (indian railways) प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या घटना नवीन नाहीत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, शिर्डी-मुंबई वंदे भारत ट्रेनमध्ये (vande bharat) एका प्रवाशाला रेल्वेने दिलेल्या डाळमध्ये कीटक असल्याचा संशय आला. त्याची नीट पाहणी केल्यानंतर ते मेलेले झुरळ (cockroach)असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.
रिक्की जेसवानी नावाच्या प्रवाशाने त्याच्या ट्विटर हँडलवर आयआरसीटीसीला (IRCTC) टॅग करत आणि भारतीय रेल्वेद्वारे दिल्या जाणाऱ्या जेवणाची स्थिती पोस्ट केली. "आम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये शिर्डी (shirdi) ते मुंबई (mumbai)रात्रीचे जेवण करत होतो आणि डाळीत मेलेले झुरळ आढळले...... लेखी तक्रार 16103 दि 19.08.2024 ला दिली... हा नवा भारत आहे," असे संतप्त प्रवाशाने पोस्ट केले.
दुसऱ्या एका प्रवाशाने पोस्टला प्रतिक्रिया दिली की, "मी त्याच ट्रेनमध्ये प्रवास करत होतो आणि मला शिळे दही मिळाले. दुर्दैवी म्हणजे मी आज सकाळी मुंबईहून शिर्डीला गेलो होतो तसेच वंदे भारतमध्येही मला शिळे दही मिळाले. जेवण ताबडतोब बदलण्याची गरज आहे.”
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) अधिकाऱ्यांनी तक्रारींची तात्काळ दखल घेतली आणि पुढील कारवाईसाठी त्यांना त्यांचे PNR क्रमांक शेअर करण्यास सांगितले.
भारतीय रेल्वेने दिल्या जाणाऱ्या अन्नात कीटक सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कमलापती ते जबलपूर जंक्शनला जाणाऱ्या एका प्रवाशाला झुरळ सापडले होते. गेल्या वर्षी भोपाळ-दिल्ली वंदे भारत ट्रेनमध्ये एका प्रवाशालाही झुरळ सापडले होते, त्यानंतर रेल्वेने खाद्यपदार्थ विक्रेत्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता.
हेही वाचा