Advertisement

तानसा पाईपलाईन जवळील डेब्रिज लवकर हटणार


तानसा पाईपलाईन जवळील डेब्रिज लवकर हटणार
SHARES

तानसा जलवाहिनी आणि डक लाईनच्या जवळची बेकायदा बांधकामे हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर पालिकेच्या 'एन' विभागाने कातोडीपाडा, खंडोबा टेकडी आणि राम नगर येथील डक लाईन परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करत 1 हजार 938 बांधकामांवर कारवाई केली. मात्र कारवाईनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात डेब्रिज तयार झाले आहेत आणि ज्याचा त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हे डेब्रिज उचलण्यासाठी यंत्रणा देखील वाढवण्यात आल्या होत्या. मात्र या यंत्रणा अत्यंत धिम्या गतीने काम करत असल्याची तक्रार स्थानिक मारुती साळसकर यांनी केल्यानंतर एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे, नगरसेवक सुरेश पाटील आणि नगरसेविका स्नेहल मोरे यांनी भागाची मंगळवारी पाहणी केली.

दरम्यान, डेब्रिज लवकरात लवकर उचलण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी स्थानिकांना देण्यात आले आहे. तसेच आता रात्रीच्या वेळी देखील डेब्रिज उचलण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले.


हेही वाचा - 

डेब्रिजने अडवला 'एन' विभागातील रहिवाशांचा रस्ता

घाटकोपरच्या जलवाहिनीजवळील झोपड्या हटविण्यास सुरूवात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा