महापालिका कार्यालयाबाहेरच ढिगारे

 M G Road
महापालिका कार्यालयाबाहेरच ढिगारे
महापालिका कार्यालयाबाहेरच ढिगारे
महापालिका कार्यालयाबाहेरच ढिगारे
महापालिका कार्यालयाबाहेरच ढिगारे
महापालिका कार्यालयाबाहेरच ढिगारे
See all

गोरेगाव - महापालिकेनं अनधिकृत दुकानांवर कारवाई केल्यानंतर गोरेगाव येथील पी/ दक्षिण विभाग कार्यालयाच्या बाहेर राडारोडा तसाच पडून आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेनं पी/ दक्षिण विभागाच्या पालिका कार्यालयाच्या आसपास असलेली अनधिकृत दुकानं तोडली होती. मात्र तिथला राडारोडा तसाच पडून आहे. त्यामुळे या भागातलं डासांचं प्रमाण वाढलं आहे. तसंच तिथे रात्री गर्दुल्ल्यांचंही वास्तव असतं. त्याचा त्रास नागरिकांना होतोय. याबाबत पालिका परिवेक्षण विभागाचे अधिकारी अमित पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, या जागेवर महापालिका काम करणार आहे. ही जागा स्वच्छ करून ठेवली तर परत इथे दुकानं मांडली जातील, म्हणून इथे फक्त पत्रे लावून ठेवले आहेत.

Loading Comments