Advertisement

मुंबईच्या 'या' भागात फटाक्यांचा सर्वाधिक आवाज


मुंबईच्या 'या' भागात फटाक्यांचा सर्वाधिक आवाज
SHARES

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं फटाके कमी प्रमाणात फोडण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, या आवाहनाला नागरिकांनी फारसा चांगला प्रतिसाद न दिल्याचं निदर्शनास आलं. मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात सर्वाधिक फटाक्या फोडण्यात आल्या असून, आवाजाची सर्वाधिक पातळी १०५.५ डेसीबल इतकी नोंदवण्यात आली.

महापालिकेने लक्ष्मीपूजनाला विनाआवाजी फटाके  वाजविण्याची परवानगी दिली होती. मुंबईतल्या अनेक भागांत हे आदेश धुडकावून वसुबारसपासून फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय हरित लवाद आणि मुंबई महापालिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे अनेकांनी भुईचक्र , पाऊस, फुलबाजी अशा विनाआवाजी फटाक्यांना पसंती दिली.

आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी शनिवारी रात्री १० वाजण्यापूर्वी (फटाके  फोडण्याची मुदत संपण्याआधी) शहरातल्या काही भागांत आवाजाची पातळी मोजली. शहरात आवाजाची सर्वाधिक पातळी शिवाजी पार्क येथे १०५.५ डेसीबल इतकी नोंदवण्यात आली. शांतता क्षेत्र जाहीर झाल्यापासून पहिल्यांदाच शिवाजी पार्क इथं फटाक्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर झाला. मात्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा वापर कमी आढळल्याचा दावा त्यांनी केला.

गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान शहरात सर्वाधिक आवाजाची पातळी ११२.३, २०१८ मध्ये ११४.१, २०१७ मध्ये ११७.८ इतकी नोंदवण्यात आली होती. फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी, वायुप्रदूषणाबाबत नागरिक अधिकाधिक जागरूक होत आहेत. कोरोनामुळं क्रयशक्ती आटल्यानं फटाक्यांच्या खरेदीबाबत नागरिकांनी आखडता हात घेतला आणि प्रशासनानंही जबाबदारी लक्षात घेत फटाके फोडण्यावर निर्बंध घातलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा