मोनो नामकरणासाठी रहिवाशांचे उपोषणाचे हत्यार

 Mumbai
मोनो नामकरणासाठी रहिवाशांचे उपोषणाचे हत्यार

मुंबई - दादर मोनो स्थानकाला विठ्ठल मंदिर नाव देण्याची मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने फेटाळली आहे. त्यामुळे आता वडाळा नागरिक दक्षता समितीने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 मार्चपासून 10 जण सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती समितीचे खजिनदार दीपक शिंदे यांनी दिली आहे.

100 हून जुन्या आणि प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठल मंदिराला लागून मोनोचे दादर पूर्व मोनो स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकाचे नाव दादर पूर्व ऐवजी विठ्ठल मंदिर करावे अशी वडाळ्यातील राहिवाशांची मागणी आहे. पण आता नाव बदलणे शक्य नसल्याचे म्हणत ही मागणी एमएमआरडीएने फेटाळली आहे. आता जोपर्यँत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही तसेच उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.

Loading Comments