Advertisement

पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मान चिन्ह


पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मान चिन्ह
SHARES

राज्य पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून दिला जाणारा ‘पोलिस महासंचालक सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे. यात मुंबई शहरातील १३५ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

पोलिस दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल दरवर्षी हे सन्मानचिन्ह दिलं जातं. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी हे सन्मानचिन्ह आयुक्तालयात होणार्‍या संचलनावेळी प्रदान करण्यात येईल.


५७१ जणांना पुरस्कार

राज्यातील गृहविभागातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानाचा असलेला पोलिस महासंचालक पदक सन्मान पुरस्कार यावेळी ५७१ जणांना मिळणार आहे. शहरातील अंत्यत क्लिष्ठ आणि बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पोलिस दलातील महत्त्वाच्या पदकाने सन्मानित करण्यात येते.


यांना मिळाला पुरस्कार

या पदकामध्ये कमला मिल कंपाऊडमध्ये लागलेल्या आगीत उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस शिपाई सुदर्शन शिंदे, शहरावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीवेळी महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलिस शिपाई तेजेश सोनावणे, सुशांत जाधव, पवन तायडे, जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा जनमानसात उजळ करणाऱ्या महिला पोलिस शिपाई किरण कोठुळे, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या महिला पोलिस शिपाई वर्षा भवारी, साईगिता नाईक, यासंह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक १३५ जण मुंबई शहरात कार्यरत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा