Advertisement

डॉक्टरही रंगले नवरात्रीच्या रंगात


डॉक्टरही रंगले नवरात्रीच्या रंगात
SHARES

गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या ९ दिवसांमध्ये महिला तर विविध रंगांच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करतातच, पण पुरुषही आता नवरंगात रंगू लागले आहेत. नवरात्रोत्सवातील दुसऱ्या दिवसाचा रंग हिरवा असल्याने मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील हृदयरोग विभागातील पुरुष आणि महिला डॉक्टरांनीही शुक्रवारी हिरव्या रंगाचे अॅप्रोन घातले होते. 

यासोबतच रुग्णालयातील कर्मचारी, नर्स, टेक्निशियन, शिकाऊ विध्यार्थी अशा २२ जणांनी हिरव्या रंगाचे अॅप्रोन घातले होते. एवढंच नाही तर त्यांनी "रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" हा संदेशही दिला.

प्रत्येक सणानिमित्त धार्मिकतेबरोबरच सामाजिक प्रबोधनही केले जाते. अशा प्रकारे धार्मिक आणि सामाजिक भावना जोपासण्याचा प्रयत्न केईएम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा