Advertisement

आचारसंहितेच्या नावाखाली शहराचं विद्रुपीकरण?


आचारसंहितेच्या नावाखाली शहराचं विद्रुपीकरण?
SHARES

गोरेगाव - मुंबईमध्ये सध्या आचारसंहिता लागू असल्याने बऱ्याच ठिकाणी भिंतींवर असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या जाहिराती रंगवून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यावर आक्षेप घेत मुंबईच्या भाई मिर्लेकर यांनी आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाच्या धोरणाला वाचवावे अशी विनंती केली आहे.

पालिकेचे कर्मचारी चांगल्या वास्तूंची दुरवस्था, विद्रुपीकरण करतात. लोकप्रतिनिधींनी मेहनतीने बनवलेल्या विविध वास्तू आणि सुविधांवर नामफलक लावलेले असतात. वास्तूंच्या भिंतीवर मजकूर लिहिलेला असतो. त्यावर आपले कर्मचारी रंग फासत आहेत. त्यामुळे विद्रुपीकरण होत आहे. एक महिन्यासाठी हे विद्रुपिकरण कशासाठी? याने निष्पन्न काय होणार, मतदाराला हे खोडलेले नाव माहीत नसते काय? यापेक्षा त्यावर जुने वृत्तपत्र चिकटवले तरीही ते नंतर काढून टाकता येतील मग असे असताना देखील हे रंग फासून लोकप्रतिनिधींची नावे कशाला पुसता असा सवाल त्यांनी यात उपस्थित केला आहे. तसेच आचारसंहितेच्या नावाखाली खोडाखोड करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा