Advertisement

सँडहर्स्ट रोड येथे 'रुळांवर कचरा टाकू नका' जनजागृती रॅली


सँडहर्स्ट रोड येथे 'रुळांवर कचरा टाकू नका' जनजागृती रॅली
SHARES

मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस व पालिका सफाई पथकाच्या वतीने २९ व ३० जानेवारी रोजी २ दिवस रॅली काढून रहिवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली.

मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकात रुळांना खेटून असलेल्या इमारती व गाळ्यांमधून कचरा टाकण्याच्या प्रकाराने रेल्वे रुळांचे नुकसान होत असते. यामुळं अपघाताची शक्यतादेखील असते. त्यामुळं स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

डोंगरी पोलीस ठाण्यापासून सुरू झालेल्या या रॅलीत मेगाफोनच्या मदतीने रेल्वे रुळांवर कचरा न टाकण्याविषयी आवाहन करण्यात आलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा