लेबर कॅम्पमध्ये भीम जयंती साजरी

 Matunga
लेबर कॅम्पमध्ये भीम जयंती साजरी
Matunga, Mumbai  -  

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त माटुंगा लेबर कॅम्प येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविचारांचा खजिना जनतेसाठी सजवण्यात आला असून, भगवान गौतम बुद्धांची सुंदर सुबक मूर्ती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहीत असल्याची मूर्ती साकारण्यात आली आहे.

विभागातील सर्व जनतेचं लक्ष सुविचार आणि सुबक मूर्ती खेचून घेत होते. संकल्प सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं असल्याची माहिती अध्यक्ष आशिष मोरे यांनी दिली.

Loading Comments