Advertisement

कोरोना नियमांमुळं चैत्यभूमीवर गोंधळ

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमवारी ६५ वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्तानं महाराष्ट्रसह जगभरातील अनुयायी दादरमधील चैत्यभूमीवर येत असतात.

कोरोना नियमांमुळं चैत्यभूमीवर गोंधळ
SHARES

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमवारी ६५ वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्तानं महाराष्ट्रसह जगभरातील अनुयायी दादरमधील चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी दरवर्षी हे अनुयायी चैत्यभूमी परिसरात गर्दी करतात. यंदाही अशाप्रकारची गर्दी याठिकाणी जमल्याचं चित्र समोर आलं. मात्र, सध्या सर्वत्र कोरोना संकट असल्यानं मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र यावरुनच चैत्यभूमीवर नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानं काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याती माहिती मिळते. अनेक अनुयायी आदल्या दिवशीच दादरमध्ये येऊन थांबत असतात. मात्र यावेळी कोणत्याही सोयीसुविधा नसल्यानं संतप्त अनुयायांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासाठी आत प्रवेश दिला जात नसल्यानंही त्यांनी नाराजी व्यक्त केली.  तसंच राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेत आहेत, त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेदेखील त्यापद्धतीने दर्शन घेत आहेत. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी घोषणाबाजी सुरु केली.

पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही खाली पडले. यानंतर काही अनुयायांमध्येच तसंच पोलिसांसोबत झटापट झाली. पण काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान हे तरुण केवळ स्टंटबाजी करत असल्याचं तेथील आयोजनकर्त्यांचं म्हणणं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा