Advertisement

मेट्रोच्या कामातील गटार लाईनची कामे अपूर्णच, पुन्हा दिली ३० मेची डेडलाईन


मेट्रोच्या कामातील गटार लाईनची कामे अपूर्णच, पुन्हा दिली ३० मेची डेडलाईन
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुल मेट्रो रेल्वे स्टेेशन (भूमिगत) उभारणीचं काम सध्या सुरु आहे. या कामामुळे वांद्रे (पूर्व) परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही भीती लक्षात घेऊन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. या पाहणीमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार लाईनचे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याची बाब समोर आली आहे.


महापौरांचे काम पूर्ण करण्याचे आदेश

वांद्रे-कुर्ला संकुल मेट्रो भूमिगत स्टेशनखालून पाईपड्रेन टाकण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल २०१८ देण्यात आली होती. पावसाळ्याच्या दिवसांत परिसर जलमय होऊ नये, यासाठी १५ फुटांचे ड्रेन बनविण्यात येणार आहेत. आणि याद्वारे ते पाणी वाकोला नदीपर्यंत सोडण्यात येणार आहे. त्यानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या भागाची पाहणी केली. या पाहणीमध्ये हे काम अर्धवटच असल्याचे दिसून आले. हे काम पूर्ण न झाल्याने महापौरांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे हे काम त्वरीत पूर्ण करण्याणचे निर्देश दिले. त्यामुळे या ड्रेनेज लाईनचे काम ३० मे २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना महापौरांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केली आहे.


'पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पंप बसवा'

यावेळी साहित्य सहवास, कलानगर, मधुसूदन कालेलकर मार्गाची पाहणीही महापौरांनी केली. तसेच ज्या ठिकाणी पाणी तुंबून राहत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्याठिकाणी अधिक पंपाची व्यवस्था करण्याची सूचना महापौरांनी महापालिका अधिकाऱ्यांनाही केली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा