Advertisement

पालिका स्थापत्य समिती करणार धारावी कचरामुक्त


पालिका स्थापत्य समिती करणार धारावी कचरामुक्त
SHARES

धारावी - धारावी कचरामुक्त करण्यासाठी आता पालिका स्थापत्य समितीनं पुढाकार घेतलाय. पालिका स्थापत्य समितीचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांच्या पुढाकारानं धारावीतल्या रहिवाशांना 10 हजार कचऱ्याचे डब्बे तर इमारती आणि सोसायट्यांसाठी 200 व्हिल कंटेनरचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी महिलांना निमंत्रण देण्यात आलं होतं. धारावी स्वच्छ आणि कचरामुक्त करायची असेल तर महिलांचा सहभाग हे त्यामागील उद्दीष्ट. दिवसभर घरातून जमा होणारा कचरा महिलांनी गटारात फेकण्याऐवजी कचरा कुंडीत टाकल्यास कचरा वाढीस लागणार नाही आणि त्यातून दुर्गंधी सुद्धा येणार नाही. त्यामुळे कचरा मुक्त धारावी करण्यासाठी महिलांनी एकमतानं सहकार्य करण्याची गरज असल्यातं सूर्यवंशी म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपविभाग प्रमुख मुत्तू तेवर, महिला उपविभाग प्रमुख अनिता डोईफोडे, शाखाप्रमुख वसंत नकाशे, आनंद भोसले, कविता भागणे उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा