Advertisement

मुंबईतील नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

मुंबईतील नदी-नाल्यांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

मुंबईतील नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण
SHARES

मुंबईतील नदी-नाल्यांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करुन अहवाल सादर केला जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त इक्बासिगं चहल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या एका विशेष बैठकीत ही माहिती देण्यात आली.

नदी-नाल्यांच्या स्वच्छतेसह रस्ते, पदपथ यांची कामेदेखील निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्तांनी यावेळीपालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले. नालेसफाईप्रमाणेच रस्ते बांधकाम, रस्ते दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती यांची सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. कोणत्याही स्थितीत पावसाळा प्रारंभ होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देशही आयुक्त चहल यांनी दिले. पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांतून गाळ काढून नाला प्रवाही करण्यासाठी कामं सुरु आहेत. तसंच विभाग कार्यालयांमार्फत संबंधित विभागाच्या कार्यक्षेत्रातील छोट्या नाल्यातील गाळ काढण्याची कामं सुरु आहेत, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व कर्मचारी, कामगार यांना जॅकेट, गमबूट यांच्या सोबतीने मास्क, हातमोजे इत्यादी साधनांचा पुरवठा संबंधित कंत्राटदारांमार्फत केला जात असून सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) राखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी जास्तीत संयंत्रे उपलब्ध करुन कामे करण्यात येत आहेत. सर्व कामे ठरवलेल्या मुदतीत पूर्ण होतील, याचा विश्वास असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितले.



हेही वाचा -

धक्कादायक! लाॅकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणांवरून पत्नीला तोंडी तलाक

 
नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 13 हजार 758 जणांवर पोलिसांनी नोंदवले गुन्हे




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा