Advertisement

मध्ये रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात प्रवासी संघटना करणार आंदोलन

मध्य रेल्वेची वाहतूक ४० ते ४५ मिनिटं उशिरानं धावत असून प्रवाशांना दररोज लेट मार्कचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळं मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबाबत आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

मध्ये रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात प्रवासी संघटना करणार आंदोलन
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक मागील अनेक दिवसांपासून सतत विस्कळीत होत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड, रुळाला तडा, ओव्हरहेट वायर तुटणं यांसारख्या विविध कारणांमुळं मध्य रेल्वेची वाहतूक ४० ते ४५ मिनिटं उशिरानं धावत असून प्रवाशांना दररोज लेट मार्कचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळं मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबाबत आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

१ जुलैला आंदोलन

ठाणे रेल्वे प्रवासी संघ, कल्याण-कसारा प्रवासी संघटना, महाराष्ट्र महिला रेल्वे प्रवासी संघटना, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था यांच्या वतीनं उपनगरीय रेल्वे प्रवासी मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात १ जुलै रोजी आंदोलन करणार आहेत.

५०० हून अधिक फेऱ्या रद्द

गेल्या महिन्यात अनेक कारणांमुळं ५०० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं या सर्वाच्या निषेधार्थ प्रवाशांनी १ जुलै रोजी लोकलमधून प्रवास करताना हाताला काळी फीत बांधून मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करावा, असं आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केलं आहे.



हेही वाचा -

पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच! कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांचा सूर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा