Advertisement

घाटकोपरकरांनो, गुरूवारीच भरून ठेवा पाणी! शुक्रवारी पाणीकपात

घाटकोपर जलाशयाच्याठिकाणी १२०० मी. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर झडपा बसवण्याचं काम गुरूवार ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १.३० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम शुक्रवार ६ एप्रिल दुपार ३.३० पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.

घाटकोपरकरांनो, गुरूवारीच भरून ठेवा पाणी! शुक्रवारी पाणीकपात
SHARES

घाटकोपरमध्ये गुरूवारी मध्यरात्री जलवाहिनीच्या कामासाठी १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने घाटकोपरमधील ५ प्रभागांमध्ये शुक्रवारी पाण्याची बोंबाबोंब होणार आहे. त्यामुळे घाटकोपरकरांनो, गुरूवारी आपल्या घरातील सर्व पाण्याची भांडी भरून ठेवा आणि पाण्याचा वापर जपून करा, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.

घाटकोपर जलाशयाच्याठिकाणी १२०० मी. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर झडपा बसवण्याचं काम गुरूवार ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १.३० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम शुक्रवार ६ एप्रिल दुपार ३.३० पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.

इथल्या रहिवाशांनी घ्यावी काळजी

या जलवाहिनी दुरुस्तीच्या कालावधीत घाटकोपरमधील प्रभाग क्र. १२३, १२४, १२६, १२७ आणि १३० मधील आनंदगड, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी, डी. आणि सी. महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २.

त्याचबरोबर अमि‍नाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार रोड, सेवा नगर, ओ. एन. जी. सी. वसाहत, माझगाव डॉक वसाहत, गंगावाडी गेट क्रमांक २, अंशता विक्रोळी पार्कसाईट परिसर, सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदार वाडी या संपूर्ण विभागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, असं जलअभियंता विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

हेही वाचा-

बीएमसीतील २४७ दुय्यम अभियंत्यांच्या भरतीला मंजुरी

'महिला बचत गटांना नालेसफाईच्या कामातून का डावलले?'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा