बसथांबा की कचरा पेटी ?

 Pratiksha Nagar
बसथांबा की कचरा पेटी ?
बसथांबा की कचरा पेटी ?
बसथांबा की कचरा पेटी ?
See all

शीव - येथील लोकमान्य टिळक रुग्णालय येथील एस.टी. थांब्यावर कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. या थांब्यालगतच अर्धवट बांधलेलं केबिन आहे. त्याचं काम 10 महिन्यांपासून बंदच पडलंय. त्यामुळे असल्याने त्या जागेतही कचऱ्याचा ढीग साचला आहे. या कचऱ्याचा त्रास प्रवासी तसंच आसपासच्या दुकानदारांनाही होतोय. या संबंधित पालिकेकडे विचारणा केली असता, हा कचरा तिथून तातडीनं उचलला जाईल, असं घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यानं सांगितलं.

Loading Comments