
अमेरिकेच्या (USA) राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासनाने अल निनो (El Niño) बाबत माहिती दिली आहे.
या संस्थेच्या हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनोमुळे यंदा अटलांटिक चक्रीवादळांचा हंगाम सामान्यतः शांत राहणार आहे, असा अंदाज आहे. त्यामुळे एल निनोचा थेट परिणाम भारतावर होताना दिसेल.
एल निनो सध्या भारताच्या (india) दिशेने पुढे सरकत आहे. एल निनोमुळे चक्रीवादळ सामान्यपणे कमी होण्याची शक्यता ही 55 टक्के आहे.
तसेच चक्रीवादळ सामान्यपेक्षा जास्त होण्याची शक्यता केळ 10 टक्के आहे. त्यामुळे हा अत्यंत मोठा इशारा समजला जातो आहे.
एल निनोमुळे भारताला आधीच मोठा इशारा मिळालेला आहे. प्रशासनदेखील सतर्क आहे. अटलांटिकमधील चक्रीवादळाचा काळ हा जूनच्या सुरुवातीपासून 30 नोव्हेंबरपर्यंत मानला जातो.
हेच वादळ जून, सप्टेंबर महिन्यामध्ये अधिक तीव्र होते आणि त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या तळाच्या तापमानात वाढ होते. ही वाढ नियतकालिक वाढ मानली जाते.
या वाढीमुळे पाऊस म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर मान्सुनवर कमी अधिकचा परिणाम होतो. या व्यत्ययामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा निर्माण होऊन हाहाकार उडू शकतो.
यंदा याच एल निनोचा प्रभाव हा भारतात पाहायला मिळू शकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा भारताला मोठा फटका बसू शकतो.
सध्यातरी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सुनबाबत सर्वकाही सुरळीत आहे. पुढील चार महिने भारतात सरासरी पाऊस पडणार आहे.
फक्त मान्सुनचे आगमन थोडेसे लांबू शकते, ज्यामध्ये 3-4 दिवसांचे अंतर असू शकते. त्यामुळे एल निनोबाबत कोणतीही सध्यातरी कोणतीही चिंतेची बाब नाही, असं सांगितलं जात आहे.
याशिवाय राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनही दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
त्यामुळे आता पुढे नेमकं काय, NOAA चा अंदाज खरा ठरणार की सर्व काही सुरळीत राहून पावसाळ्याचे सर्व महिने भारतात जोरदार पाऊस बरसणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा
