Advertisement

डोंबिवली पूर्व भागात दोन दिवस वीजपुरवठा खंडित

देखभाल व दुरुस्तीचे काम महावितरणकडून केले जाईल

डोंबिवली पूर्व भागात दोन दिवस वीजपुरवठा खंडित
SHARES

डोंबिवली पूर्वेकडील रामनगर, टिळकनगर, केळकर रोड परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित केला जाणार आहे. तर आयरे गाव, म्हात्रेनगर भागाचा वीजपुरवठा महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभालीसाठी मंगळवारी काही तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे.

संबंधित भागातील वीज ग्राहकांनी याची दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टिळकनगर, रामनगर, गणेश मंदिर, केळकर रोड, टिळकनगर संचारक (फीडर) बालभवन, चिपळूणकर रोड, मानपाडा रोड, चित्तरंजन दास रोड, राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली उत्पन्न एक फीडर टाटा लाईन केळकर रोड, उर्सेकरवाडी, उर्सेकरवाडी, पूजा मधुबन, मानपाडा रोड, पूजा सिनेमागृह, शिवसेना शाखा, मनपा कार्यालय आदी ठिकाणांचा वीजपुरवठा सोमवारी (२३ मे) सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहणार आहेत.

रामनगर पोलीस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांतीनगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, न्यू आयरे रोड, आयरे गावचा वीजपुरवठा मंगळवारी (२४ मे) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत खंडित राहणार आहे.

देखभाल दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित परिसरात लवकरच वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. महावितरणच्या स्वयंचलित प्रणालीद्वारे संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे वीज खंडित होण्याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली आहे, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.



हेही वाचा

नवी मुंबईतील 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद

कपात करूनही महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचे दर चढेच

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा