Advertisement

नवी मुंबईतील 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा येणार नाही.

नवी मुंबईतील 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद
SHARES

मंगळवार म्हणजेच तारीख 24 तारखेला भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात मंगळवार 24 रोजी पाणी पुरवठा संध्याकाळी होणार नाही.

मोरबे धरण (Morabe Dam) ते दिघा मुख्य जलवाहिनी (Digha main aqueduct) व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मान्सुनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे होणार आहेत. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवणार आहे. त्याबरोबरच बुधवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे. तसेच बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाळ्यात पाणी पुरवठ्याबाबतची कामं करताना अनेक काम पालिकेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जलवाहिनी फुटणे, पाण्यात अडथळा निर्माण होणे, जोडणीची कामं ही पावसळ्यापूर्वीच करणे गरजेचे असल्याने महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर ही कामं सुरु आहेत.



हेही वाचा

बेस्टच! लवकरच बस चालवणारी पहिली महिला चालक होणार रुजू

दादरमध्ये कार पार्क करण्यासाठी व्हॅलेट पार्किंगची सुविधा सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा