Advertisement

दादरमध्ये कार पार्क करण्यासाठी व्हॅलेट पार्किंगची सुविधा सुरू

पहिली डिजिटल व्हॅलेट पार्किंग सुविधा सुरू करण्यात आली आहे.

दादरमध्ये कार पार्क करण्यासाठी व्हॅलेट पार्किंगची सुविधा सुरू
SHARES

बुधवारपासून दादरमध्ये पहिली डिजिटल व्हॅलेट पार्किंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. पालिका, मुंबई पोलीस आणि व्यापारी संघ, दादर व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

वाहनधारक त्यांची वाहने त्यांच्या फोन नंबरसह प्लाझा सिनेमाजवळील समर्पित व्हॅलेट पार्किंग बूथवर सोडू शकतात. सर्व वाहने कोहिनूर सार्वजनिक पार्किंग लॉटपर्यंत नेली जातील. परत जाण्याची वेळ आल्यावर, वाहनचालक त्यांचे वाहन प्लाझा सिनेमाजवळ आणण्यासाठी एसएमएस करू शकतं.

यासाठी पालिकेकडून एक लिंक पाठवण्यात येईल. पहिल्या चार तासांसाठी 100 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक तासासाठी अतिरिक्त 25 रुपये आकारले जातील. पार्क+, एक स्टार्ट-अप, दररोज 11 तास बूथ चालवेल.

बुधवारी प्लाझा सिनेमाजवळ पहिले बूथ उघडल्यानंतर डिजीटल व्हॅलेट पार्किंग सेवा लवकरच दादर आणि शिवाजी पार्कमधील आणखी चार ठिकाणी सुरू करण्यात येईल.

BMC 29 सार्वजनिक पार्किंग लॉट्स (पीपीएल) चालवते, परंतु यापैकी बरेच नागरिक आणि वाहनचालक रस्त्यावर पार्किंग करत आहेत.

“दादर हे शॉपिंगसाठीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. परंतु लोकांना प्रथम पार्किंगसाठी कोहिनूरकडे जाणे आणि नंतर खरेदी करण्यास बाजारात येणे कठीण वाटते. रस्त्यावर पार्किंग केल्याने हातूक कोंडी अधिक होते,” दादर व्यापारी संघाचे दीपक देवरूखकर यांनी ही माहिती टाईम्स ऑफ इंडियाला दिली.  

गतवर्षी सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी तीन महिने मोफत व्हॉलेट पार्किंगची व्यवस्था केली होती. प्रतिसाद जबरदस्त होता. “दररोज सरासरी 85 कार व्हॅलेट्सद्वारे पार्क केल्या जात होत्या. दिवाळीच्या दिवशी ही संख्या ९४ वर पोहोचली,” देवरुखकर म्हणाले. त्यानंतर, व्यापार्‍यांच्या संघटनेने पार्क + या स्टार्ट-अपशी हातमिळवणी केली, असंही दीपक देवरुखकर म्हणाले.

दादर व्यापारी संघाचे सुनील शहा म्हणाले, “फक्त दुकानदारच नाही, दादर आणि शिवाजी पार्कला भेट देणारे कोणीही नातेवाईकांना भेटण्यासाठी, कामावर जाण्यासाठी किंवा मित्रांसोबत बाहेर जेवायला जाण्यासाठी वॉलेट पार्किंगचा लाभ घेऊ शकतात,”

“आम्ही मॅरेज हॉल आणि शॉपिंग सेंटर्सच्या बाहेरील सर्व रस्त्यावरील पार्किंग बंद करू. आमच्याकडे कोहिनूर पीपीएलमध्ये 1,721 कारसाठी जागा आहे,” जी-उत्तर वॉर्डचे बीएमसीचे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर म्हणाले.

"आम्ही विवाह हॉल आणि शॉपिंग सेंटर्सना आवाहन केले आहे की त्यांनी अभ्यागतांना व्हॅलेट पार्किंग सुविधा वापरण्यास सांगावे," असंही किरण दिघावकर बोलले.

मुंबई पार्किंग प्राधिकरणाच्या सदस्यांनी सांगितले की, जेथे पीपीएलची जागा कमी आहे तेथे व्हॅलेट पार्किंगला प्रोत्साहन दिले पाहिजे. वाहनचालकांच्या अभिप्रायावर अवलंबून, शहराच्या इतर भागातही व्हॉलेट बूथ उभारले जाऊ शकतात.



हेही वाचा

मुंबई गेटवे ते मांडवा या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद

मुंबईतल्या पुराचा अलर्ट BMCकडून थेट मोबाईलवर!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा